शनिपालट व साडेसाती तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?
शनिपालट केव्हा ?साडेसाती म्हणजे काय ?..साडेसातीत काय काळजी घ्यावी. ?
फाल्गुन कृष्ण.आमावस्या शनिवार २९ मार्च २०२५ रात्री ०९:४२ मी शनी मीन राशीत प्रवेश करीत आहेत त्याचा पुण्यकाल सायंकाळी ०६:४८ ते रात्री १२:३६ पर्यंत आहे.*
म्हणजे मकर रास साडेसातीतून मुक्त होत आहे व मेष राशीला साडेसाती सुरवात होईल. शनी ग्रहाचे चाली नुसार 6 महिने आधीपासून त्यांची छाया पुढच्या ग्रहावर पडते.त्यामुळे २९ सप्टेंबर २०२४पासून साडेसाती असलेल्या जातकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
हा मीन राशीचा शनि मीनेस १ला, कुंभेस २रा, मकरेस ३रा, धनूस ४था, वृश्चिकेस ५वा, तुळेस ६वा, कन्येस ७वा, सिंहेस ८वा, कर्केस ९वा, मिथूनेस १०वा, वृषभेस ११वा आणि मेषेस १२वा याप्रमाणे आहे.*
*मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ-मीन- मेष या राशींना साडेसाती आहे.
जन्म राशी = पाद. = फल*
वृषभ = सुवर्ण = चिंता
तुला, = सुवर्ण = चिंता
मीन = सुवर्ण = चिंता
कर्क, = रौप्य = शुभ
वृश्चिक, = रौप्य =. शुभ
कुंभ = रौप्य =. शुभ
मिथुन, = ताम्र =श्रीप्राप्ती
कन्या. = ताम्र. =श्रीप्राप्ती
,मकर = ताम्र =श्रीप्राप्ती
मेष , = लोह =. कष्ट
सिंह , =. लोह =. कष्ट
धनु = लोह = कष्ट
विशेषतः पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक व पिडापारीहारक आहे.* पिडापरिहारक शनीची दाने := सुवर्ण, लोखंड, नीलमणी, उडीद, म्हैस, तेल, काळे घोंगडे, काळी अगर निळी फुले.
जपसंख्या : २३०००, प्रतिमा : लोखंडाची
शनीचा पौराणिक मंत्र :
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम| छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम||
अशुभ स्थाने :> स्वजन्मराशीपासुन १,२,४,५,७,८,९,१२,या स्थानी असलेला शनि पिडाकारक आहे.
शनीच्या प्रतिमेच्या पूजनाचा व दानाचा संकल्प ;-
मम जन्मराशे: सकाशात अनिष्ट स्थानस्थितशने: पिडापरीहारार्थ एकादशस्थानवत शुभफल प्राप्त्यर्थ लोहप्रतिमाया शानैश्चरपूजनं तत्प्रितीकरम (अमुक) दानंम करिष्ये||
|| ध्यान ||
आहो सौराष्ट्र संजात छायापुत्र चतुर्भुज |
कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुर्धर |
त्रीशुलिश्च समागच्छ वरदो गृध्रवाहन| प्रजापतेतू संपूज्य: सरोजे पश्चिमेदले|
दानाचा श्लोक:> शनैश्चरप्रीतीकरं दानं पीडा निवारकम! सर्वांपत्ती विनाशायं द्विजाग्र्याय ददाम्यहम!!
शनी स्तोत्र
कोणस्थ: पिंगलो बभ्रु: कृष्णौ रौद्रोंतको यम:| सौरी: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत||
एतानि दशनामानी प्रतरुत्थाय य: पठेत! शनैश्चरकृता पिडा न कदाचित भविष्यती!!
पीप्पलाद उवाच
नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते| नमस्ते बभ्रुरुपाय कृष्णायच नमोस्तुते!!१!!
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकायच || नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरयेविभो !!२!!
नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते ||प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च!!३!!
वरील शनिस्तोत्र ज्यांना साडेसाती आहे ज्यांना शनि अनिष्ट आहे त्यांनी दररोज प्रातःकाळी म्हणावे
ज्यांना साडेसाती आहे त्यांनी शनिस्तोत्र रोज म्हणावे. शनीच्या उद्देशाने जप, दान, पूजा ही आवश्य करावी. पिडा परिहारार्थ शनिवारी अभ्यंगस्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद व मीठ शनीस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पीडेचा परिहार होईल. शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त रहावे. निलमान्याची अंगठी धारण करावी.
साडेसाती का येते ?
साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत. मुख्यत्वेकरून माणसाचा अहंकार शनिमहाराज तोडतात. खोटे बोलणे वागणे हे शनी महाराजांना बिलकुल पसंत नाही .त्याचबरोबर आपल्या जीवनाला साडेसाती एक चांगली दिशा ही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते
शनी ना ही कुछ भुलते है, और ना ही क्षमा करते है वो तो कर्मफलदाता तथा दंडनायक है, सिर्फ सच्चा न्याय करते है।
खरे शनीची साडेसाती… धसका ? कि दिलासा ?
आपल्या संपूर्ण आयुष्यात कुणाला घाबरत असेल तर “शनी महाराजांना”. शनीची साडेसाती आली आता माझे काही खरे नाही… अश्या प्रकारची विधाने आपण ऐकत असतो. पण खरच त्यात घाबरण्यासारखे काही आहे का ? चला आज ह्या समज गैरसमजापलीकडे असलेल्या ह्या ग्रहाची खरी ओळख करून घेवूया आणि त्यांच्यापुढे नतमस्तकही होवूया . शनी म्हणजे त्रास , वेदना , मानसिक यातना ,क्लेश याची जणू शृंखलाच अशीच आपली समजूत आहे. अमुक एका माणसाचे साडेसातीत हे हे असे झाले म्हणजे माझेही तसेच होणार हा समज सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका.
प्रत्येकाच आयुष्य वेगळ आहे आणि प्रत्येकाच्या पत्रिकेतील शनीची स्थितीही वेगळीच असणार आहे. शनीचा धसका घेण्याऐवजी जर त्याला निट समजून घेतलत तर त्याबद्दल असणारे गैरसमज तर दूर होतीलच उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास मदतच होईल. मला सांगा आयुष्यात काय फक्त साडेसातीच्या काळातच वाईट घटना घडतात का ? नाही इतरही वेळी घडतात. खर तर साडेसाती हि मानूच नका. शनी हा तुमचा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे. शनी ज्याला कळला त्याला सगळेच सोपे होवून जाईल. अहो आपला एक संपूर्ण दिवस सुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो मग संपूर्ण साडेसात वर्ष वाईटच जातील हे असे का समजायचे , विचार करा.
शनीची साडेसाती हि साडेसात वर्षाची असते हे आपण सर्वांनाच माहित आहे. एखाद्याची रास “सिंह “ असेल तर शनी कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा ह्या सिंह राशीला साडेसाती सुरु झाली असे समजावे आणि जेव्हा शनी तुला राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीची साडेसाती संपली असे समजायचे . याचाच
अर्थ कर्केत २|| वर्षे ,सिंहेत २|| वर्षे आणि कन्येत २|| वर्षे असा साडेसात वर्षाचा काळ म्हणजे सिंहराशीची साडेसाती .
आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या आधीच्या राशीच शनी आला कि आपल्याला साडेसाती सुरु आणि आपल्या पुढील राशीतून शनी जेव्हा पुढे जाईल तेव्हा आपली साडेसाती संपली अस समजायचे. सध्या मेष, मिन आणि मकर राशिना साडेसाती असेल .
शनी हा वैराग्याचा , उदासीनतेचा कारक आहे. आळशी, अप्रामाणिक लोक शनीला अजिबात नाही आवडत. कष्ट करणारा समाज शनीला आवडतो. असेल हरी तर देयील खाटल्यावरी म्हणणार्यांना शनी झोडपून काढेल. शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार , मिजास ज्या माणसाना अतिशय मिजास आहे तसेच जी माणसे अत्यंत माजोरीपणाने, अहंकाराने मी म्हणजे कोण ? अश्या थाटात वागत असतात त्यांना शनीची साडेसाती कशी गेली विचारा.*
साडेसातीत माणसाची सगळी मिजास उतरते, मी असा आणि मी तसा म्हणणाऱ्यांची शनी झोप उडवतो. शनी साडेसातीत मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो, अंतर्मुख होण्यास शिकवतो. साडेसाती मध्ये लग्न होणे, घर होणे , परदेशगमन , चांगली नोकरी , प्रमोशन मिळणे अश्या चांगल्या घटनाही घडतात. साडेसाती दर ३० वर्षांनी येते कारण एका राशीत शनी २|| वर्षे वास्तव्य करतो त्यामुळे पूर्ण आयुष्यात साडेसाती कमीतकमी २ वेळा तरी येते असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त विपरीत घटनांचे खापर मात्र शनी महाराजांवर फोडणे हा मनुष्य स्वभावाच आहे. परंतु हि पळवाट योग्य नाही. साडेसातीत आपली वाईट कर्मे एकामागून एक आपल्या समोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठावण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात इतकच. तुमच्या चांगल्या कार्माचही फळ ते नक्कीच देतात.
इतर कुठल्याही देवाची पूजा करत नसलात तरी शनी महाराजांचे नित्य स्मरण तुमचे जीवन आनंदी करेल यात शंकाच नाही.
साडेसातीत खोटे आरोप येणे, तुरुंगवास, अप्तेष्टांबरोबर कलह , कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे, घरातील इस्टेट जमिनी वरून वाद , व्यवसायाची हानी होणे , अपकीर्ती , दीर्घ आजारपण, आपत्ती, धननाश होणे, अपमानास्पद घटना घडणे , मनस्ताप , आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरणे यासारख्या गोष्टी घडून येतात.
कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा जास्ती व्यक्तींना साडेसाती येणे हे चांगले नाही. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र ६/८/१२ या स्थानात असतो त्यांना तसेच ज्यांना शनी किंवा राहूची महादशा, अंतरदशा चालू आहे अश्या लोकांना साडेसाती संघर्षमय जावू शकेल. चंद्र-शनी युती हि पत्रिकेत चांगली नाहीच.
साडेसातीत काय करावे ?
सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.*
बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे. मंदिरात दर्शन घेवून तसेच पुढे बाजारात किंवा तसेच पुढे इतरत्र जावू नये. जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. एक लक्ष्यात ठेवा आपण करत असलेली कुठलीही साधना किंवा उपाय याचा उहापोह किंवा त्याची कुठेही चर्चा करू नये. कारण त्याचे फळ कमी होते, मी १०००० जप केला हे सांगणे म्हणजेही एक प्रकारचा अहंकाराच आहे. हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.दर शनिवारी शनी महात्म्य म्हणून छोटीशी पोथी मिळते वाचण्यास फक्त 15 मिनिटे लागतात ती अवश्य वाचावी
शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
हा शनीचा जपही जमेल तितका करावा…हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे.
आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो.
चला तर मग आज शनी बद्दलचे सगळे समाज गैरसमज दूर झाले का ? मनातील मरगळ झटकून नवीन उत्चाहाने कामाला लागूयात. आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेतहीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
आता जरा चढती साडेसाती मध्यातील साडेसाती व उतरती साडेसाती प्रत्येक राशीला केव्हा ते पाहू …
मेष रास:- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५ ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८
पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक ३ जुन २०२७ ते २० ऑक्टोबर २०२७ तसेच २३
२०२८ ते ८ ऑगष्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक ८ ऑगष्ट २०२९ ते ५ अॉक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.
वृषभ रास:- ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक ३ जुन २०२७ ते २० ऑक्टोबर २०२७ तसेच २३ फेब्रुवारी ते २०२८ ते ८ ऑगस्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक ८ ऑगस्ट २०२९ ते ५ ऑक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै २०३४ पावेतो.
मिथुन रास:- ८ ऑगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ ऑगष्ट २०३६ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक ८ ऑगष्ट २०२९ ते ५ ऑक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै २०३४ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.
कर्क रास:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै २०३४ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ ऑक्टोबर २०३८. तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.
सिंह रास:- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ अॉक्टोबर २०३८ तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २२ ऑक्टोबर २०३८ ते ५ एप्रिल २०३९ पावेतो तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ व ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेंबर २०४१ पावेतो.
कन्या रास:- २७ ऑगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० ऑगष्ट २०४४ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ अॉक्टोबर २०३८ तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.
मध्यातील साडेसाती:– दिनांक २२ ऑक्टोबर २०३८ ते ५ एप्रिल २०३९ तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ तसेच ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेंबर २०४१ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २८ जानेवारी २०४१ ते ६ फेब्रुवारी २०४१ तसेच २६ सप्टेंबर २०४१ ते ११ डिसेंबर २०४३ तसेच २३ जुन २०४४ ते ३० ऑगष्ट २०४४ पावेतो.
तुला रास:- २२ ऑक्टोबर २०३८ रोजी सुरु होईल व दिनांक ७ डिसेंबर २०४६ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- २२ ऑक्टोबर २०३८ ते ५ एप्रिल २०३९ तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ पावेतो तसेच ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २८ जानेवारी २०४१ ते ६ फेब्रुवारी २०४१ तसेच २६ सप्टेबर २०४१ ते ११ डिसेंबर २०४३ पावेतो तसेच २३ जुन २०४४ ते ३० ऑगष्ट २०४४ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक ११ डिसेंबर २०४३ ते २३ जुन २०४४ तसेच ३० ऑगष्ट २०४४ ते ७ डिसेंबर २०४६ पावेतो.
वृश्चीक रास:- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु होईल व दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक ५ नोव्हेंबर २०११ ते १६ मे २०१२ तसेच ४ ऑगष्ट २०१२ ते २ नोव्हेंबर २०१४ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २ नोव्हेंबर २०१४ ते २६ जानेवारी २०१७ तसेच २१ जुन २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१७ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी २०१७ ते २१ जुन २०१७ पावेतो तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० पावेतो.
धनु रास:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु होईल व दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २ नोव्हेंबर २०१४ ते २६ जानेवारी २०१७ तसेच २१ जुन २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१७ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी २०१७ ते २१ जुन २०१७ तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १६ जानेवारी २०२३ पावेतो.
मकर रास:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी २०१७ ते २१ जुन २०१७ तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.
कुंभ रास:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५ ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
मिन रास: २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० रोजी संपेल.
चढती साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.
मध्यातील साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५ पावेतो ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
उतरती साडेसाती:- दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ ते ८ ऑगष्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.
साडे साती म्हणजे काय?
जेव्हा गोचरीचा शनी चंद्रराशीवरून किंवा त्याच्या बाराव्या तसेच दुसऱ्या स्थानांवरुन भ्रमण करतो तेव्हा त्याला साडे साती असे म्हणतात. शनीची साडेसाती एकाच वेळेस तीन राशींमध्ये १) चढती साडेसाती २) मध्यातील साडेसाती ३) उतरती साडेसाती याप्रमाणे लागते ,आणि हा काळ जातकांसाठी त्रासदायक व अनिश्चितेचा ठरतो .
चढती साडेसाती:- हा शनीच्या साडेसातीचा आरंभ काळ आहे. या काळात शनी चंद्रापासुन बाराव्या स्थानात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
आर्थिक नुकसान, गुप्तशत्रुंकडुन धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दौर्बल्य. ह्या कालावधीत तुमचे गुप्त शत्रु त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी संबंध बिघडतील, तुमच्या कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. यामुळे ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे. परंतु अखेरीस फळ मिळेल, त्यामुळे धीर धरुन वाट पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे. सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.
मध्यातील साडेसाती:- हा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनीची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रावरुन संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
आरोग्य विकार, चारित्र्यहनन, नात्यांतील लोकांकडून अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. तुमची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले स्थान आरोग्याचे स्थान असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. तुमचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून तराल.
उतरती साडेसाती :- हि शनी साडेसातीची मावळती दशा आहे. शनी चंद्रापासुन दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या महत्वाच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व तुम्हाला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी – शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे – विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.
वरील भाकिते साधारण स्वरुपाची आहेत व साडेसाती हानिकारक असते या समजुतीवर आधारित आहेत. खरे पाहता, आम्हाला असे दर वेळी काही आढळलेले नाही. फक्त साडेसातीवरच आधारित निष्कर्ष चुकू शकतो. त्यावेळची इतर ग्रहांची दशा व शनीचा स्वभाव, असे अंग देखील मोजमापात घ्यायला हवे ज्यावरून साडेसातीचा काळ अनुकूल अाहे की प्रतिकूल अाहे ते ओळखता येईल. आमचा सल्ला आहे की वरील भाकीते फार गंभीरपणे घेऊ नयेत
जीवन म्हणजे सुख-दुःखाचा संगम. माणसाच्या आयुष्यात दु:खामागे सुख नक्कीच येतं. विशेषत: साडेसाती असणार्या जातकांच्या शेवटच्या टप्प्यात शनिदेवाची कृपा निश्चितच होते. तर दुसरीकडे जेव्हा वेळ चांगली येणार असते किंवा तुम्ही श्रीमंत होणार आहात, तेव्हा काही शुभ चिन्हे आधीपासूनच याकडे संकेत करतात.
म्हणून शनिमहाराज व साडेसाती.हा..वास्तव दर्शनाचा काळ
*साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत. त्याचबरोबर आपल्या जीवनाला एक चांगली दिशा ही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते.
आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेत हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
।।शुभम भवतु ।।
Search
Recent Posts
- vaishakh Amavasya 2025 वैशाख अमावस्या 2025: करें ये उपाय और पाएं पितृ दोष.
- खग्रास Chandra Grahan : 2025 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार, कोणत्या नियमांचे पालन करावे?
- नवपंचम राजयोग 2025: 18 मई को बनने जा रहा है एक शुभ और दुर्लभ संयोग Navpachama yog 2025
- मुहूर्त के प्रकार: शुभ समय की पूरी जानकारी Muhurta-niti-niyam shubh-muhurat
- धन-वैभव के दाता शुक्र बदलेंगे चाल – इन राशियों की चमकेगी किस्मत! Venus, the giver of wealth and prosperity,
Recent Posts
- vaishakh Amavasya 2025 वैशाख अमावस्या 2025: करें ये उपाय और पाएं पितृ दोष.
- खग्रास Chandra Grahan : 2025 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार, कोणत्या नियमांचे पालन करावे?
- नवपंचम राजयोग 2025: 18 मई को बनने जा रहा है एक शुभ और दुर्लभ संयोग Navpachama yog 2025
- मुहूर्त के प्रकार: शुभ समय की पूरी जानकारी Muhurta-niti-niyam shubh-muhurat
- धन-वैभव के दाता शुक्र बदलेंगे चाल – इन राशियों की चमकेगी किस्मत! Venus, the giver of wealth and prosperity,
- सूर्यसिध्दांत Sury – sidhant काय असतो ?
- 1000 Vishnu Sahastra Naame |
- अन्तश्चेतना और स्वस्तिकासन: मानसिक शांति, ध्यान और आध्यात्मिक विकास के लिए सर्वश्रेष्ठ मार्ग
- शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?
- living Room as pre vastu | वास्तुनुसार living Room लिव्हिंग रूम/ड्रॉईंग रूम/हॉलची (दिवाणखाना) दिशा व रचना.
- 5 पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान | Panchatatve vastu shastra
- Pitta dosh upay | पित्त दोष: लक्षण, रोग और इसे संतुलित रखने के आसान उपाय
- Mulank 1 मूलांक 1 का विवाह भाग्य का फल ?
- 5 mukhi Rudraksha मुखी रुद्राक्ष पहनने के फायदे
- Rashi Fal 2025 का राशिफल
- Lagna Yog Yantra | लग्न योग यंत्र: विवाह आणि ग्रह दोष निवारणासाठीचे प्रभावी साधन
- Money Doesn’t Stay? Know the Reasons and Remedies
- होली 2025: रंगों का त्योहार | Holi 2025
- अमावस्या शांती साहित्य
- Santan Gopal Mantra and Santan Gopal Yantra: Unlocking Divine Blessings for Parenthood
Products
-
Graha Peeda Niwaran yantra shani yantra | sadesati niwaran
₹390Original price was: ₹390.₹299Current price is: ₹299. -
Shree Sampoorna Mahalakshmi Mahayantra – Energized Yantra for Wealth, Success & Protection | Vedashree Jyotish
₹390Original price was: ₹390.₹289Current price is: ₹289. -
Ashtadhatu Mahamrityunjay Yantra Pendant for Protection & Positivity – Vedashree Jyotish
₹400Original price was: ₹400.₹349Current price is: ₹349. -
Sulemani Hakkik bracelet Black Tourmaline Bracelet Positive Energy Bracelets Meditation Bracelet Beaded Bracelet
-
Shri Baglamukhi Yantra | Kawach | Win Over Enemies And Rivals | Protect From Black Magic, Spirits And Evil Eyes | Religious | Spirituality | Divine
₹300Original price was: ₹300.₹259Current price is: ₹259. -
महालक्ष्मी यंत्र: Positive Energy Sampoorna Kuber Yantra – Prosperity Begins Here
₹300Original price was: ₹300.₹259Current price is: ₹259. -
Saraswati Yantra – Brass Yantra for Wisdom, Knowledge, and Success in Education
₹300Original price was: ₹300.₹259Current price is: ₹259. -
katyayani yantra marriage yog originale
₹390Original price was: ₹390.₹356Current price is: ₹356. -
Lagna Yog Yantra vedashree jyotish
₹399Original price was: ₹399.₹342Current price is: ₹342. -
Santan gopal yantra
₹599Original price was: ₹599.₹499Current price is: ₹499. -
Graha Peeda Nashak Yantra
₹299Original price was: ₹299.₹259Current price is: ₹259. -
Matsya Yantra Is Used For Wealth And Good Fortune-BRASS
₹299Original price was: ₹299.₹259Current price is: ₹259. -
Shri Vyapar Vridhi Yantra
₹259Original price was: ₹259.₹200Current price is: ₹200. -
Sampurna Vyapar Rudhi Yantra: Unleashing Business Prosperity
₹599Original price was: ₹599.₹499Current price is: ₹499. -
Shree Sampurna Yantra: The Ultimate Guide to Wealth, Success, and Protection
₹599Original price was: ₹599.₹499Current price is: ₹499. -
Sampurna Nava Graha Yantra: Balancing Planetary Energies
₹599Original price was: ₹599.₹499Current price is: ₹499. -
Shree sampurna Kuber Yantra 10.5 inch X 10.5 inch
₹599Original price was: ₹599.₹499Current price is: ₹499.