A stunning view of a starry night sky featuring the Milky Way galaxy.

खग्रास चंद्रग्रहण केव्हा आहे ? 2025 Moon

Chandra Grahan : 2025 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार, कोणत्या नियमांचे पालन करावे?

भाद्रपद शु. १५, रविवार दि. ७/८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या खग्रास
चंद्रग्रहणाची माहिती –

भाद्रपद शु. १५, रविवार दि. ७/८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहण

भाद्रपद शु.१५, रविवार दि. ७/८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या खग्रास
चंद्रग्रहणाचा स्पर्श पुणे येथे रात्रौ ०९:५७ मिनिटांनी होत असून मोक्ष
रात्रौ. ०१:२७ मिनिटांनी होत आहे. या ग्रहणाचा मध्य हा रात्री. ११:४२
मिनिटांनी होत आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून खग्रास स्वरूपात
दृश्यमान होणार आहे. तसेच भारत सोडून चीन, म्यानमार, थायलंड, इजिप्त,
नायजेरिया, रशिया, जर्मनी, इंडोनेशिया, बांग्लादेश, इटली, कोरिया,
ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, फ्रान्स, लंडन इ. ठिकाणी दृश्यमान होईल.
पुण्यासाठी या ग्रहणाचे गणित केल्यास चंद्रबिंब ग्रासमान १६ अंगुल २०
व्यंगुल इतके आहे. संपूर्ण भारतात एकाच वेळी ग्रहणाचे स्पर्श, मध्य व मोक्ष
दृश्यमान होतील. ते पुढीलप्रमाणे-

स्पर्शमध्यमोक्षपर्वकाळ
रात्रौ ०९.५७रात्रौ ११.४२रात्रौ ०१.२७३ तास ३० मिनिटे


ग्रहणाचे वेधः- हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात लागत असल्यामुळे
‘चंद्रग्रहे ग्रहणप्रहरादर्वाक् यामत्रयं वेधः’ या वचनानुसार ७ सप्टेंबर २०२५ रोजी घृतपूर्ण
दुपारी १२.३२ पासून ग्रहणवेध सुरू होतो. लहान मुले, अशक्त, आजारी, वृद्ध
व गर्भवती स्त्रियांनी सायं. ०५.०८ पासून वेध पाळावेत.
नियम – वेधामध्ये भोजन व जलपान करु नये. ग्रहण काळात म्हणजेच स्पर्श ते
मोक्ष या कालावधीत मल-मूत्र विसर्जन, भोजन, जलपान, अभ्यंगस्नान, झोप दान
व संभोग ही कामे करु नयेत. ग्रहणाचा स्पर्श होताच स्नान करावे. चंद्रग्रहणी तम
गोदावरी व गंगा स्नान महापुण्यकारक होय. तसेच ग्रहण मोक्ष झाल्यावर स्नान
करावे. ग्रहणकाळात स्नान, दान, जप, होम, तर्पण, श्राद्ध, मंत्रपुरश्चरण इ. कामे वेड
करावीत. ग्रहण सुटण्यास आरंभ झाल्यावर दान करावे. ग्रहणात जननाशौच व
मृताशौच असले तरीहि दोष नाही. थोडक्यात ग्रहणात होम, जप इ. करण्यास व
सूतकादि दोष नाही. ग्रहणात करावयाचे श्राद्ध आमान्नाने किंवा हिरण्याने करावे,
अन्नाने करु नये. ग्रहणाचे पूर्वीच पाणी इत्यादिंवर तीळ, दर्भ किंवा तुळस टाकून
ठेवावे म्हणजे ते घेण्यास दोष नाही.
रजोदर्शन असलेल्या स्त्रियांनी देखील

“स्नाने नैमित्तिके प्राप्ते नारी यदि
रजस्वला । पात्रान्तरिततोयेन स्नानं कृत्वा व्रतं चरेत् ।।”

या वचनानुसार
पात्रात पाणी घेऊन त्या पाण्याने स्पर्श व मोक्षाचे स्नान करून जप इत्यादी
करावे. प्रत्यक्ष ग्रहणकाळात झोप घेतल्यास रोग, लघुशंका केल्यास दारिद्रय,
मलविसर्जन केल्यास किड्याची योनि, मैथुन केल्यास डुकराची योनि व भोजन
केल्यास नरकप्राप्ती होते असे शास्त्र सांगते.


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *