Kanya Rashi | कन्या राशी

Rashi fal 2024 2023 2022

Kanya Rashi | कन्या राशीसाठी 2023 कसे असेल .

rashi-removebg-preview

चैत्र:- शुभग्रहांची मोठी साथ राहील. अफलातून भाग्योदय होतील. नवपरिणीतांचे भाग्योदय. वास्तुयोग. पौर्णिमेजवळ घरात मोठी मंगलकार्ये. उत्तरार्ध कोर्टप्रकरणातून त्रासाचा. सूर्यग्रहण विचित्र घटनांचे.

वैशाख:- वादग्रस्त मुद्दे टाळा. जुनाट व्याधींचा त्रास होऊ शकतो. बाकी पूर्वार्ध व्यावसायिक प्राप्तीचा. नोकरीत प्रशंसा. उत्तरार्ध आर्थिक व्यवहारांतून साशंकतेचा. कर्जप्रकरणांतून त्रास. अमावास्या जागरणाची.

ज्येष्ठः- ग्रहमान थोडं विसंगत. मात्र पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्रभ्रमण छान फलद्रुप होईल. व्यावसायिक गुप्तचिंता जातील. उत्तरार्धात सरकारी कामे. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. अमावास्या व्याधींतून वेदनादायी.

आषाढ:- हातापायाच्या दुखापती जपा. पूर्वार्धात भावाबहिणीच्या चिंता. पौर्णिमेजवळ नोकरीत भाग्योदय. मानसन्मानाचे योग. उत्तरार्ध घरात वैद्यकीय खर्चाचा. अमावास्येजवळ फसवणुकीचे योग.

अ. श्रावणः- शनिशी होणारे ग्रहयोग आचारसंहिता पाळायला लावतील. नोकरीत सांभाळा. बाकी पौर्णिमेजवळ शुक्रभ्रमण सर्वकष शुभ राहील. व्यावसायिक सतत प्राप्ती. घरात शुभकार्ये. अमावास्येजवळ उष्णताजन्य विकार. नि. श्रावण:- राशीचा मंगळ आणि रविशनि प्रतियुती नियोजित कामांतून बेरंग करु शकते. पौर्णिमा सांभाळा. बाकी उत्तरार्ध मध्यस्थीतून लाभ देईल. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. अमावास्या गर्भवतींना संवेदनशील.

भाद्रपदः- आर्थिक नियोजन करा. जुगार टाळा. पौर्णिमेजवळ ज्वरपीडा, भातृचिंता. पौर्णिमा प्रवासात बेरंगाची. व्यावसायिक मोठ्या प्राप्तीची. सूर्यग्रहणाजवळ विशिष्ट गुप्तचिंता. नुकसानीचे भय.

आश्विनः- मोठ्या ग्रहांचे कुयोग झळा पोहोचवतील. मंगळबुधाचे साहचर्य शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर त्रासदायक. पौर्णिमा फसवणुकीची. उत्तरार्धातील. बुधशुक्रांची भ्रमण आर्थिक कोंडी फोडणारी. उत्तरार्ध नैसर्गिक साथ न देणारा. अमावास्या नुकसानीची.

कार्तिक:- शनिमंगळांचे योग नैसर्गिक पाठबळ देणार नाहीत. पौणिमेजवळ कुवार्ता अस्वस्थ करतील. उत्तरार्ध आर्थिक भरभराट करणारा. नोकरीत बढतीची चाहूल. स्वतंत्र व्यावसायिकांना पतप्रतिष्ठेचा लाभ.

मार्गशीर्ष:- आरोग्यविषयक पथ्ये पाळाच. वृद्धांनी दुखापती सांभाळाव्या. पौर्णिमेजवळचा मंगळबुध योग सार्वजनिक जीवनातून कटकटीचा. बाकी उत्तरार्ध काहींना परिस्थितीजन्य लाभ देणारा. व्यावसायिक वसुली. सरकारी कामे होतील.

पौषः- बुधमंगळाची स्थिति मानवी उपद्रव देईल. नोकरीत गैरसमजातून त्रास बाकी पौर्णिमेजवळ मोठे व्यावसायिक लाभ. परिचयोत्तर विवाहयोग. उत्तरार्ध अतिशय गतिमान राहील. वैयक्तिक सुवार्तांचा भर.

माघः- पूर्वार्ध मंगळशुक्र सहयोगातून तरुणांना उत्तम. विशिष्ट कलागुणांतून यश. व्यावसायिकांचे खरेदीविक्रीचे उत्तम व्यवहार. उत्तरार्ध विचित्र हेवेदाव्यांतून त्रासदायक. अमावास्येजवळ फसवणुकीची चिंता सतावेल.

फाल्गुन:- चंद्र आणि सूर्यग्रहणाचा महिना जपून राहण्याचाच. भावना उद्रेकापासून जपा. प्रेमप्रकरणे सांभाळा. नोकरीत पूर्वार्ध छान. वरिष्ठांची कृपा राहील. उत्तरार्ध सतत खर्चाचे प्रसंग आणेल. सूर्यग्रहणाजवळ दुखापतीचे प्रसंग.

Similar Posts

  • Gurucharitra 11 Adhyay | गुरुचरित्र 11

    ॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥ अध्याय अकरावा – कथासार अध्याय अकरावा. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म फलश्रुती – संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल श्रीगणेशाय नमः । सिद्धमुनी नाम धारकाला म्हणाले – ‘ज्या विधवा स्त्रीने शनिप्रदोषव्रत केले तीच पुढच्या जन्मी अंबाभवानी म्हणून जन्मास आली. कारंजा गावातील माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्र झाला. तो जन्मतःच ‘ॐ…

  • Tula Rashi | तूळ राशी साठी 2023

    तूळ राशी साठी 2023 कसे असेल | Tula Rashi 2023 चैत्र:- सप्ताहात वाद टाळा. नोकरीतील शत्रुत्व सांभाळा. पौर्णिमेपर्यत शुक्रभ्रमणाचा लाभ. व्यावसायिक प्राप्ती. तरुणांना विवाहयोग. उत्तराध कटकटीचा. सूर्यग्रहण वृद्धांना जपण्याचे. भागीदारीतून त्रास.

  • shree Ganesh strotra

    shree Ganesh strotra॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।लम्बोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपःधूमकेतुर्गणाध्यक्षः फालचन्द्रो गजाननः ।

  • | | |

    कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

    कालसर्प योग काय आहे?स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोगया जगात जेव्हा कुठलाही प्राणी ज्यावेळी जन्म घेतो ती वेळ त्या प्राण्याच्या सर्व जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाते. कारण त्या एका क्षणाच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने त्याच्या संपुर्ण जीवनाचा एक असा आलेख तयार केल्या जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याच्या जीवनातील वेळो वेळो घडणाऱ्या शुभ व अशुभ घटनांच्या विषयी वेळेच्या आधीच जाणता येऊ शकते.

  • मंगल यंत्र

    मंगल ग्रह के अशुभ होने से रक्तचाप, रक्त विकार, खुजली, फोड़ा-फुसी, रक्तसाव कुष्ठ रोग, आकस्मिक दुर्घटना जन्य रोग, अग्नि भय, गुप्त रोग, सूजन, वात, पित्त संबंधी रोग होते हैं

  • How to do pranayama | इस प्रकार से प्राणायाम करनेसे आपकी जीवन बदलेगा.

    प्राणायाम करनेका सही तरीका आपका जीवन बदल देगा | सूर्यभेदी प्राणायाम | how to do pranayam. रोजाना कौन सा प्राणायाम करना चाहिए? प्राचीन भारत के ऋषि मुनियों ने कुछ ऐसी सांस लेने की प्रक्रियाएं ढूंढी जो शरीर और मन को तनाव से मुक्त करती है। इन प्रक्रियाओं को दिन में किसी भी वक़्त खली पेट…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.